निमा म्युच्युअल बेनेफिट स्किम
निमा म्युच्युअल बेनेफिट स्किम ही फक्त निमा सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित नसून त्यांच्या परिवाराला प्राधान्य देऊन बनविलेली आहे. जवळपास सर्व निमा सदस्य हे खाजगी व्यावसायिक असून त्यांना शासनाद्वारे कोणत्याही प्रकारचे निवृत्तीवेतन मिळत नाही.
इ.स. १९८८ मध्ये निमाच्या वरिष्ठ सदस्यांनी यावर अत्यंत सखोल विचारविनिमय करून निमा म्युच्युअल बेनेफिट स्किमचा प्रस्ताव तयार केला व त्यास स्वतः पुढाकार घेऊन मूर्त स्वरूप दिले.
यामध्ये प्रामूख्याने खालील बाबींचा विचार केलेला आहे.
१) निमा म्युच्युअल बेनेफिट स्किमच्या सदस्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर आश्रीत परिवारास आर्थिक सहाय्यता देणे.
२) आजारी सदस्यांना औषधोपचारासाठी आर्थिक सहाय्यता प्राप्त करून देणे.
३) निमा म्युच्युअल बेनेफिट स्किमच्या सदस्याच्या दुर्भाग्याने कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्यता प्राप्त करून देणे.
सुरुवातीस ही योजना १५ वर्षांसाठी होती व आर्थिक सहाय्यतेची रक्कम रु. २०,०००/- होती. सन १९९२-९३ पासून क्रमाक्रमाने वाढत ती रू. २२,०००/-, रू. ३०,०००/- वरून सध्या रू. ५०,०००/- झालेली आहे.
सम्पूर्ण भारतामध्ये निमाचे २०,००० हून अधिक सदस्य असून १५,००० पेक्षा जास्त सदस्य हे वय वर्ष ६० पेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांच्यासाठी ही म्युच्युअल बेनेफिट स्किम नक्कीच लाभदायी ठरणार आहे.
आजघडीला या स्किमचे सुमारे १४०० सदस्य आहेत. ही सदस्य संख्या ३००० पेक्षा अधिक झाल्यास म्रुत्यपश्चात देण्यात येणारा देयनिधी रू. ०१,००,०००/- ( रुपये एक लाख) किंवा त्यापेक्षा अधिकही असू शकतो. त्यामुळे अधिकाधिक निमा सदस्यांनी या स्किममध्ये सदस्यता घेणे उचित ठरेल.
निमा म्युच्युअल बेनेफिट स्किमसाठी आवश्यक बाबी –
१) निमाचे आजीवन सदस्य असणे आवश्यक आहे ( निमा आजीवन सदस्यता अर्ज प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा )
२) वय वर्षे ६० पेक्षा कमी असावे.
३) निमासदस्यांचे पती / पत्नी वैद्यकिय क्षेत्रातील नसतील तरी काही अटींच्या अधीन राहून त्यांनाही या योजनेमध्ये सहभागी होता येईल.
४) सदर योजनेचा लाभ सदस्यता घेतल्यानंतर सहा महिन्यांनी लागू होईल.
५) जे सदस्य पाच वर्षे किंवा अधिक काळ योजनेअंतर्गत नियमित आहेत व काही कारणाने सदर सदस्य आजारी असल्यास व त्याचा औषधोपचाराचा खर्च रू. २०,०००/- पेक्षा अधिक असेल तर त्या सदस्याला आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास या योजनेअंतर्गत त्वरीत रू. १०,०००/- चा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ, जर सदर लाभ घेतलेला सदस्य पुढील पाच वर्षे नियमित असेल तर, परत घेता येतो. सदर अदा करण्यात आलेली रक्कम शेवटी वारसाला अदा होणा-या रकमेतून वजा केली जाईल.
६) सदर योजनेत सदस्यत्व घेतल्यापासून २० वर्षांनंतर पुढील प्रत्येकवर्षी केवळ रू. १००/- द्यावे लागतील. ##इतर सदस्यांसाठी खाली दिलेला तक्ता पहावा.
७) सर्व सदस्यांकडून जमा झालेली या योजनेतील रक्कम राष्ट्रियकृत / को.ऑप. बँकेत फिक्स डीपॉझिट स्वरूपात ठेवली जाते.
८) या योजनेत पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षीचा आर्थिक जमाखर्चाचा हिशेब सी.ए. कडून प्रमाणित करून निमा राष्ट्रिय कार्यकारिणीत मांडला जातो.
९) सदर योजनेत काही अटींच्या अधीन राहून एकरकमी स्वरूपात सदस्याची रक्कम स्विकारली जाते.
१०) अनियमित सदस्यांना सदर योजनेतील कोणताही लाभ मिळत नाही.
११) निमा म्युच्युअल बेनेफिट स्किमचे सदस्य रक्कम बँक ऑफ इंडिया, परळ शाखा, मुंबईच्या बचत खाते क्र. - 008310100008151 यात कुठुनही अदा करू शकतात. सदर खात्यात रक्कम जमा केल्यावर सदर व्यवहाराची माहीती योजनेच्या पदाधिका-यांना पाठविणे आवश्यक आहे.

## इतर सदस्यांनी द्यावायाच्या रकमेचा तक्ता पुढीलप्रमाणे -
डॉ. शांतीलाल शर्मा चेअरमन, निमा म्युच्युअल बेनेफिट स्किम केन्द्रिय निमा (लातूर) फोन – ९४२३०७५६२८ |
डॉ.मनोज सांगळे कन्वेनर, निमा म्युच्युअल बेनेफिट स्किम केन्द्रिय निमा (गुरुकुंज आश्रम, अमरावती) फोन – ९८२२९२४१२८ |
डॉ. सुमंत पंड्या कोषाध्यक्ष, निमा म्युच्युअल बेनेफिट स्किम केन्द्रिय निमा (मुंबई) फोन – ९८१९८१२०८४ |
सदस्य - डॉ. जे. के. राय, मुंबई
- डॉ. एस. डी. सुरते, सोलापूर - डॉ. ए. के. जोशी, मुंबई |
Ex Offico Memebrs ( मानद सदस्य) - - डॉ. डी. जी. कदम - अध्यक्ष, निमा सी.सी.
- डॉ. विनायक टेंभूर्णीकर - महासचिव, निमा सी.सी. - डॉ. आशुतोष कुलकर्णी - कोषाध्यक्ष, निमा सी.सी. |